एमआयएमच्या नंदुरबार जिल्हा कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न..
-निवडणूक कधीही येऊ घातली आहे, कार्यकर्त्यांनी आत्तापासून तयारीला लागावे.- रफअत हुसैन

0

नंदूरबार/ प्रतिनिधि

मंगळवार दिनांक 17/10/2023 नंदुरबार जिल्हा एमआयएम पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यात नंदुरबार शहरातील कारकुनांसह तळोदा, नवापूर,

शहादा येथील कारकुन व जबाबदार, महिला विंगचे जबाबदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय समाजातील प्रतिष्टीत लोक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद रफअत हुसेन साहेब होते, कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सय्यद फरहत हुसेन साहेब यांच्या देखरेखीखाली करण्यात आले होते, नंदुरबारमध्ये मजलिसचे कार्य, सुरुवातीपासून आजपर्यंतचा कारकुनाचा संघर्ष व त्याग, आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती व भविष्यात मजलीस कशी मजबूत करता येईल यावर चर्चा करण्यात आली, शहादा तालुका अध्यक्ष साजिद पिंजारी, नवापूर तालुका उपाध्यक्ष मौलवी मुस्तफा मणियार, नंदुरबार शहर कार्याध्यक्ष सय्यद अर्शद सर यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले.

सय्यद रफअत हुसेन यांनी नंदुरबार नगरपालिकेचे काम आणि सेक्युलरिजम च्या नावाखाली मुस्लिम मते मिळवून शिवसेना नंतर भाजप समर्थित शिंदे गट मध्ये गेलेल्या नेत्यांच्या गलथान कारभार सर्वांसमोर मांडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि आतापासूनच आगामी निवडणुकीची तयारी सुरू करून मजलिसला यशस्वी करण्यासाठी एकजुटीने कामाला लागा आणि असद साहेब व इम्तियाज साहेब यांचे हात बळकट करण्याबाबत मार्गदर्शन केले, रज्जाक पार्क शाखा, अली साहेब मोहल्ला शाखा, कुरेशी मोहल्ला शाखा, एस.आर.नगर शाखा यांच्यासह पटेलवाडी, द्वारकाधीश नगर येथील सर्व जबाबदार मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मजलिसचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सैय्यद फरहत हुसेन यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचे व मेहनती टीमचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!