मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक पार पडली.

0

24 प्राईम न्यूज 18 Oct 2023

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबत मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना

जमीन वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा सर्वंकष आढावा घेऊन जमीन न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना ती देण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत.

या बैठकीत सातारा जिल्ह्यातील तापोळा(ता. महाबळेश्वर) येथील जिल्हापरिषदेच्या बोटी व बार्जद्वारे जलवाहतूक करणाऱ्या कामगारांचे वेतन अदायगी बाबत तसेच त्यांना मदत व पुनर्वसन विभागात कसे सामावून घेता येईल याबाबत चर्चा झाली.

बैठकीत प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन झालेल्या २२ गावांच्या नागरी सुविधांची पूर्तता करण्यासाठी यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश सुद्धा देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!