माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेची बैठक संपन्न..

एरंडोल/ कुंदन ठाकुर एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात माजी जिल्हाध्यक्ष आरिफ पटेल यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी कलम ४ (ख) ची माहिती अपडेट करण्यासाठी पत्रव्यवहार करणे, वेळोवेळी चर्चासत्र घेणे, माहिती अधिकार विषयाची माहिती घरा घरात पोहोचवणे व जनजागृती करणे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आरिफ पटेल यांनी विविध विषयावर माहिती अधिकाराचे महत्व सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष बबन पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पाटील, राजधर महाजन, नितीन ठक्कर, तुषार शिंपी, मनोज बिर्ला, सिताराम मराठे, सोपान माळी, विज्ञान पाटील, गणेश मराठे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.