प्रा. सुरेशजी पांडे सर यांचे “कर्म हीच पूजा” या विषयावर न्यू इंडीया अश्युरंस कं. येथे व्याख्यान.

एरंडोल/ कुंदन सिंह ठाकुर
जलगांव येथे पांडे क्लासेस चे संचालक प्रा. सुरेश पांडे सर (इंग्रजी व संस्कृतचे गाढे अभ्यासक ) स्वयंविकास व देहबोली सारख्या अनेक विषयांवर अत्यंत अभ्यासू असलेले व्यक्तिमत्व, यांचे कर्म हीच पूजा”* या विषयावर विभागीय कार्यालय न्यू इंडीया अश्युरंस कं. लि.मंडोरे मार्केट, जळगांव. कार्यालया मार्फत सोमवारी दिनांक १६ रोजी व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक जावेद अहमद होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा सुरेश पांडे होते. कार्यक्रम चे सुत्रसंचलन अभिकर्ता अधिकारी शिरीष तारे सर होते.
यावेळी विभागीय टाप ५० मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली बद्दल अभिकर्ता स्वाती कुलकर्णी मॅडम यांच्या ही सत्कार अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्म हीच पूजा या विषयावर पांडे सर यांचे व्याख्यान अतिशय उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम पूर्णतवास नेण्यासाठी विशेष सहकार्य तेजस कुलकर्णी, प्रकाश गलवाडे, पुरुषोत्तम न्याती, रोनक जैन, सचिन मेथाळकर, पंकज सोनी, शरद तायडे याचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी अभिकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते..