महाराष्ट्रात ‘एक राज्य एक गणवेश.. -येत्या शैक्षणिक वर्षापासून अमलबजावणी..

24 प्राईम न्यूज 19Oct 2023. राज्यात आता पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्याथ्र्यांना एक समान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे. मोफत गणवेश योजने संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे कार्यवाही करू नये अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.