अमळनेरात जिल्हा कुस्ती निवड चाचणी पार पडणार..

अमळनेर(प्रतिनिधि)
अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने जळगांव जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा रविवार (ता.२२) रोजी बाजार समितीच्या आवारात पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने या स्पर्धा होणार असून राज्याचे मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.माजी आमदार राजी
व देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,महाले सर,सुनील देशमुख,जिल्हा कुस्ती संस्था उपाध्यक्ष संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित राहतील.
तालुका कुस्तीगीर संघाचे तालुका अध्यक्ष बाळु संतोष पाटील, संजय कौतिक पाटील,शब्बीर पैलवान, संजय पाटील, प्रताप शिपीं, रावसाहेब पाटील,भरत पवार विजय शेखनाथ पा प्रवीण पा हसन पहेलवान राजुपहेलवान हरी शेळके आदींनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.
