माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज;पोट निवडणुकी साठी गलवाडा ग्रामपंचायत साठी एका जागेवर चार उमेदवारी अर्ज..

सोयगाव / साईदास पवार
सोयगाव, ता.१९…माळेगाव पिंप्री ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी सरपंच पदासाठी एकमेव तर सदस्य पदासाठी तीन तर गलवाडा ग्रामपंचायत पोट निवडणुकी साठी एका जागेसाठी चार उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल झाले आहे त्यामुळे गलवाडा ग्रामपंचायत च्या पोट निवडणुकीच्या एका जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे दरम्यान शुक्रवारी( ता.२०) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे त्यामुळे शुक्रवारी (ता.२०) माळेगाव पिंप्री सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल
सोयगाव तालुक्यात माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूक आणि गलवाडा कवली आणि डाभा या तीन ग्रामपंचायत च्या चार जागांसाठी पोट निवडणूक साठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी अंतिम मुदत आहे गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत माळेगाव पिंप्री ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी कल्याणी तुळशीराम पाटील यांचा एकमेव तर सदस्य पदासाठी अमोल ज्ञानेश्वर पाटील पुंडलिक अर्जुम पाटील सरलाबाई पुंडलिक पाटील असे तीन अर्ज प्राप्त झाले असून गलवाडा ग्रामपंचायत साठी एका जागेवर चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे गुरुवारी शिवसेना(शिंदे गट) संजय इंगळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी दत्तू इंगळे ,भारत इंगळे,जीवन पाटील,फिरोज पठाण,,मधुकर इंगळे,दीपक औरंगे,सुरेश जाधव,रवी इंगळे,अक्षय औरंगे, पवन इंगळे,सुनील इंगळे, शेनफड लवटे,सोमनाथ इंगळे आदी शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दरम्यान कवली आणि डाभा या दोन ग्रामपंचायत च्या पोट निवडणूक साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता
—नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळेत वाढ
ग्रामपंचायत निवडणूक साठी ऑनलाइन अर्ज दाखल करतांना येणाऱ्या अडचणी मुळे निवडणूक आयोगाने सकाळी अकरा ते तीन ऐवजी वेळेत वाढ करून साडे पाच वाजेपर्यंत वाढ केली आहे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे नायब तहसीलदार हेमंत तायडे विजय कोळी सचिन ओहोळ आदींचे पथक पुढाकार घेत आहे……