धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा;अन्यथा मतदान नाही-धनगर आरक्षण प्रश्नावर सोयगाव तहसील वर धडक मोर्चा..

सोयगाव/साईदास पवार
सोयगाव, ता..१९…आरक्षण नाही तर मतदान नाही अशा घोषणा देत गुरुवारी दुपारी तीन वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून नि

घालेला धनगर समाजाच्या मोर्चा दुपारी चार वाजता सोयगाव तहसील वर धडकला होता यावेळी तालुक्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद मोर्चा ला दिला होता
धनगर समाजाला गेल्या ६५ वर्षा पासून अनुसूचित जमातीच्या सवलती पासून वंचित ठेवण्यात आले आहे केंद्र आणि राज्य शासनाने तात्काळ धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला देण्यात यावा या प्रमुख मागणी साठी गुरुवारी सोयगावला धनगर समाज आणि मल्हार सेनेच्या वतीने भव्य मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला मल्हार सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे करी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस स्थानक मार्गे सोयगाव तहसील वर धडकला यावेळी लहुजी शेवाळे, नाना साबळे,गयाबाई सावळे,विष्णू नवते सुनील दुधे कारभारी दांगोडे दीपक बुधाळ मधुकर हासे नारायण खिल्लारी करण नपते रामदास दुधे राजेंद्र दुधे आदींनी मोर्चा चे नेतृत्व केले मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी मल्हार सेनेचे लहुजी शेवाळे यांनी मोर्चा कर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी धनगर समाजाला आरक्षण मिळत नसेल तर हा समाज मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला नायब तहसीलदार नाना मोरे यांना मागणीचे निवेदन लहुजी शेवाळे नाना साबळे गयाबाई साबळे कारभारी दांगोडे नारायण खिल्लारी यांच्या हस्ते देण्यात आले धनगर समाजाच्या मोर्चा साठी बसप चे संघपाल सोनवणे भगवान पवार रघुनाथ राठोड सदाशिव राठोड यांनी पाठींबा देऊन हजेरी लावली होती यावेळी यादव काटकर ज्ञानेश्वर जेथे कैलास जेठे गोविंदा शिंदे शंकर जेठे अविनाश जेठे भगवान तवर साळूबा भोजने कारभारी खिल्लारी रंजना बाई दांगोडे रंजना बाई भोजने मीराबाई भोजने कल्पना बाई शिंदे गणेश खिल्लारी एकनाथ दांगोडे आदी मोर्चात सहभागी होते..