अंगारकीला पद्मालय देवस्थानच्या विश्वस्ताकडून दिव्यांगांना अरे रावी व अपमानास्पद वागणूक..

एरंडोल(प्रतिनिधी)तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणेश दर्शनासाठी प्रदीप फराटे, रूपाली चौधरी, उदय पाटील (गालापूर) हे मागील प्रवेश प्रवेशद्वाराकडून गणेश दर्शनासाठी गेले असता. विश्वस्त भिका महाजन (नागदुली) यांनी अरे रावीचे वर्तन करीत अपमानास्पद बोलून दिव्यांगांना दर्शनासाठी मध्ये जाऊ दिले नाही .अशी तक्रार विश्वस्त एडवोकेट आनंदराव पाटील व पोलीस निरीक्षक एरंडोल यांच्याकडे करण्यात आली. तिघे दिव्यांग व्यक्ती हे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत.
१० जानेवारी रोजी दिव्यांगांसाठी गणेश दर्शनाची कोणतीही व्यवस्था नव्हती, ते दर्शनाला गेले असता. त्यांना मध्ये जाऊ दिले नाही त्यामुळे तिघे दिव्यांग पदाधिकारी गणेश दर्शनापासून वंचित राहिले. विश्वस्ताच्या मनमानी मुळे तिघे दिव्यांग व्यक्ती श्री गणेश दर्शन न करता घरी परतले.
सदर विश्वस्तावर अधिनियम २०१६ नुसार कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदन देताना एरंडोल तालुका प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते