सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी रुमने व दांडे घेऊ—मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक विजय काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती..

सोयगाव/साईदास पवार
सोयगाव,दि.२९…उपोषण कर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे त्यांना काहीही झाल्यास जबाबदारी सरकार वर राहील व (दि.३० )ऑक्टोबर पासून तालुकभर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक विजय काळे यांनी रविवारी रात्री सात वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली
आरक्षण साठी सरकार सकारात्मक चर्चा करत नसेल तर सरकार ला ताळ्यावर आणण्यासाठी रुमने व दांडे घ्यावे लागेल हाच पर्याय शिल्लक आहे असेही त्यांनी सांगितले दरम्यान पत्रकार परिषदेत आगामी आंदोलन ची दिशा ठरवून सोमवारी सायंकाळी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तसेच शहरातील मयूर मनगटे दत्ता गाडेकर शिवाजी दौड हे तीन तरूण आमरण उपोषणाला सोमवारी प्रारंभ करणार आहे यावेळी रवी काळे,रवींद्र काळे,विजय काळे, सुनील काळे,युवराज वामने, मयूर मनगटे, दीपक पाटील,पंकज देशमुख,कृष्णा पाटील,विजय वामन भागवत पाटील आदी मराठा क्रांती मोर्चा च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..