उद्धव ठाकरेंना आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

24 प्राईम न्यूज 1Nov 2023

मराठा आरक्षणावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही नैतिक अधिकार नाही. ते याबाबत काही करू शकले नाहीत. आता आम्ही करायला लागलो म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहे हे. मराठा समाजाला आणि आम्हालाही माहीत आहे, असे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडले देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्याकाळात मराठा समाजाला आरक्षण दिले.
उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्यानंतर तिथे ते टिकवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते ?उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ? यांनी हे आरक्षण टिकवले नाही, मराठा आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्हीच आहात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनावले