महाराष्ट्रात हिंसेला थारा नाही – फडणवीस.      

0

24 प्राईम न्यूज 1 Nov 2023

बीडमध्ये ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. लोक घरात असताना घरे जाळण्याचा प्रयत्न झाला. त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. लोक घरात असताना घरे जाळण्याचा प्रकार करतानाचे व्हिडीओ पोलिसांकडे असून आतापर्यंत त्यातील ५० ते ५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. उर्वरित सगळ्यांची ओळख पटविण्यात येणार असून अशा आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!