पाडळसरे धरणासंदर्भात खासदारांनी राजीनामा द्यावा, व धरण गतीमानतेने होण्यासाठी केले आंदोलन..

0

अमळनेर/प्रतिनिधि

पाडळसरे धरणासंदर्भात खासदारांनी राजीनामा द्यावा, व धरण गतीमानतेने व्हावे यामागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या बांधकामाला सुमारे 26 वर्ष झाली असून अजून 40 टक्के ही धरण पूर्ण झाले नाही. 142 कोटी रुपये किंमत असलेले धरण आज सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीचे झाले आहे. हे धरण पूर्ण होईपर्यंत सुमारे दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. धरण पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील हे देखील सांगता येत नाही. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे. शासन लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे हे अपयश आहे. सुमारे पाच लाख जनतेच्या पाण्याच्या प्रश्नांकडे तत्कालीन व विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केले आहेत त्यांचा आम्ही निषेध करत राजीनाम्याची
मागणी निवेदनाद्वारे केली आहे.जनतेने लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन केले पाहिजे. धरणाचे काम जलद गतीने पूर्ण झाले पाहिजे व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे. यासाठी हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत, उद्योग व शेतीला पाणी मिळाले तरच खऱ्या अर्थाने विकास होईल. अमळनेर तालुका अवर्षणप्रवण असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते याची जाणीव होण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे. परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे निवेदन यावेळी प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी प्रा अशोक पवार लिखित पाडळसरे धरण संदर्भात पुस्तिका देखील वितरीत करण्यात आली. या धरणे आंदोलनात भारत जोडो अभियानाचे प्रा अशोक पवार, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ बी एस पाटील, डॉ अनिल शिंदे, गोकुळ बोरसे, भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, एस. सी. तेले, संदीप जैन, डी. एम. पाटील, आर. बी. पाटील, उमाकांत ठाकूर, प्रभाकर पाटील, जी.एम. पवार, पी. वाय. पाटील, अशोक पाटील, रमेश शिरसाठ, संदीप सोनवणे, आसिफ बागवान, रणजित पाटील, पन्नालाल मावळे, अशोक छाजेड, गिटीश पाटील, गजेंद्र साळुंखे, रमेश महाजन, राज पाटील आदी सहभागी झाले होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!