कळमसरेत हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात

0

तरुणाचा सहभाग, गावात भक्तिमय वातावरणाणे दुमदुमला परिसर

अमळनेर/प्रतिनिधि

कळमसरे ता. अमळनेर येथील श्रीराम मंदिर संस्थान, श्रीराम भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून सालाबादा प्रमाणे या वर्षीही अश्विन कृष्ण षष्टी शुक्रवारी ता. ३ नोव्हेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होत आहे. अश्विन कृष्ण दशमी ता.१० नोव्हेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. कीर्तन सप्ताहाचे ४२ वे वर्ष असून परिसरातील या हरिनाम कीर्तन सप्ताहात पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती असते.
शुक्रवारी ता.३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ नंतर मंत्रोच्चार व विधीवत पुजन अभिषेक करून विठ्ठल- रुक्मिणी मुर्ती स्थापित करून संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या प्रतिमासह श्रीराम सीता माता मूर्ती पूजन करून हरिनाम सप्ताहाची मांडणी होईल. यात दैनिक कार्यक्रमात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.किर्तना साठी वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हजेरी लावून किर्तनची सेवा देणार आहेत.त्यात ता. ३ रोजी शुक्रवारी ह.भ.प. खुशाल महाराज-पिंपळगावकर, शनिवारी ता.४ रोजी ह भ प विशाल महाराज -बोरनारकर, रविवारी ता.५ रोजी ह भ प देवगोपाल शास्त्री महाराज- आडगावकर, सोमवारी ता.६ रोजी हभप लीलाधर महाराज -ओझरकर, मंगळवारी ता.७ रोजी ह भ प चेतन महाराज- मालेगावकर, बुधवारी ता.८ रोजी ह भ प अमोल महाराज-आळंदीकर, गुरुवारी ता. रोजी दुपारी ४ ते ६ पालखी सोहळा होऊन विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांची व गीता भागवत ग्रंथाची गावभर मिरवणूक काढण्यात येईल व रात्री हभप दीनानाथ महाराज नाशिककर यांचे कीर्तन होऊन शुक्रवारी ता. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप राजेंद्र महाराज निंभोरेकर यांचे काल्याचे जाहिर कीर्तन होऊन १२ ते २ या वेळात महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान येथील हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साह शिगेला पोहोचला असून,गावातील युवक व जेष्ठ मंडळी नोकरी व कामानिमित्त बाहेरगावी असलेले अनेकजण देणगी देऊन हातभार लावीत आहेत.तर,कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेष्ठांच्या मार्गदर्शनाने गावातील नवयुवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!