प्रामाणिकपणे शिक्षण संस्था चालवणाऱ्या संस्थाचालकांना छळणाऱ्या लाचखोर शिक्षण अधिकाऱ्यांचा शिक्षण खात्यातील कर्मचारी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करतील का.? – – श्रीमती प्रभावती परदेशी

धुळे/अनिस खाटीक

धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे,त्यांचे सहकारी लिपिक पाटील व महाले यांना धुळ्याच्या भ्रष्टाचार विरोधक शाखेच्या (ACB) अधिकाऱ्यांनी लाच स्विकारतांना रंगे हात पकडले.शिक्षण विभागात बोकाळलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या हिमनगाचा दिसणारा हा फक्त एक टोक आहे. पाण्याखाली भ्रष्टाचाराचे किती मोठे हिमनग लपलेले आहे, हे डोळ्याला दिसत नाही. तशीच परिस्थिती शिक्षण विभागाची झालेली आहे.
दि.३ ऑगस्ट २०२३ रोजीच्या दै.पुण्यनगरी या वर्तमान पत्रात शाळेची बेकायदेशीर कामे नियमित करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे आरोप संस्थाचालकावर करण्यात आला होता.परंतू चार दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालय हे भ्रष्टाचाराचे माहेर घर असल्याचे ACB च्या कारवाई वरुन सिध्द झाले आहे.कुठलेही काम असो पैसे घेतल्या शिवाय करायचे नाही, वरुन कुणी संस्थाचालकाने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुध्द खोट्या तक्रारी करुन त्याच्या संस्थेला अडचणीत आणण्याचे काम हे महाभ्रष्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी करीत असतात याचा अनुभव पावलो पावली येत आहे. मनिष पवार नावाच्या तत्कालीन अधिकारी व त्यांचे पाठीराखे कर्मचाऱ्यांनी आता आपल्या विभागातील भ्रष्टाचार विरुध्द काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करतील काय.?? रंगेहात लाज घेताना सापडल्याने शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली असुन , लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही व्हावी, असे सीओ व कलेक्टर यांना निवेदन देतील का ?? की आपण सर्व एकाच माळेचेमणी म्हणून गप्प बसतील.
महोदय आपण नुकतेच बदली होवून येथे आला आहात,येथील कार्यपध्दती अजून आपणांस कळण्यासाठी थोडा अवधी लागेल.आपण प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहात.आपल्या कडून जनतेला अपेक्षा आहे.
शैक्षणिक संस्था,शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थ्यांना फक्त चिरीमिरी साठी वेठीस धरणाऱ्या शिक्षण विभागातील राजरोसपणे चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण निश्चितच कठोर पावले उचलून जिल्ह्यातील संस्था चालकांना व जनतेला भ्रष्टाचार मुक्त वातावरण उपलब्ध करुन द्याल हा ठाम विश्वास आहे.
मी एक महिला असून माझी एक छोटी शैक्षणीक संस्था आहे.संस्थेच्या कामा निमित्त शिक्षण विभागात येणे होत असते. या विभागातील भ्रष्टाचार विरुद्ध माझ्या संस्थेचा लढा हा आजही सुरु आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना ठाण्यात ट्रेक केले होते.पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सुरेखा देवरे यांची योग्य ती विभागीय चौकशी होऊन त्यांना कायम स्वरुपी पदावरुन बडतर्फ करण्यात यावे.
देशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांची पैशांसाठी छळ करणाऱ्या या भ्रष्टांना शासन व्हावे. जेणे करुन यापुढे कुणी अशी हिंमत करणार नाही.हे कठीण असले तरी अशक्य नाही. असे आपल्या कार्यपध्दती कडे पाहून विश्वास वाटतो.
