शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे युथ रेडक्रॉस शाखा स्थापन..

एरंडोल(प्रतिनिधी) राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती चे औचित्य साधून भारतीय रेडक्रॉस संघटनेची युथ रेडक्रॉस शाखा शास्त्री फार्मसी महाविद्यालय, पळासदल एरंडोल, जि. जळगाव येथे स्थापन करण्यात आली. सदर कार्यक्रमात भारतीय रेडक्रॉस संघटनेचे जळगाव विभागाचे पदाधिकारी श्री. गनी मेमन , श्री. विनोद बियाणी ,श्री. नितीन विसपुते हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री. गनी मेमन यांनी विध्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले, श्री. विनोद बियाणी यांनी भारतीय रेडक्रॉस संघटनेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली तसेच युथ रेडक्रॉस संघटना आरोग्य, सेवा, मैत्री या त्रिसूत्री तत्वावर सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करते असे सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शास्त्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधील आहे. तसेच युथ रेडक्रॉस शाखेच्या माध्यमातून शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी जनजागृती रॅली, ब्लड डोनेशन कॅम्प, अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि रेडक्रॉस मुळे या आणि यासारख्या उपक्रम आयोजित करण्यासाठी बळकटी मिळेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ . रूपा शास्त्री उपस्थित होते व त्यांचे विशेष योगदान लाभले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख, प्रा. सुनील पाटील, प्रा. राहुल बोरसे, प्रा. हितेश कापडणे व समस्त प्राध्यापक वृंद तसेच संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. शेखर बुंदेले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिंक्य जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले.