एरंडोल येथे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल येथे ओम नगर व डी डी एस पी महाविद्यालयात, पाटील वाडा, या ठिकाणी जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ओम नगर येथे तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराच्या मानकरी शकुंतला पाटील, रुबीना, प्रतिभा लीलाधर पाटील, ह्या असून त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे, शकुंतला अहिरराव, शोभा पाटील, आरती महाजन, वर्षा शिंदे, शोभा साळी, नीलिमा मानुधने, आरती ठाकुर, स्वाती पाटील ,क्षमा साळी, सुषमा पवार , पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, गटविकास अधिकारी दादाजी जाधव विजय महाजन अमित पाटील डॉक्टर सुरेश पाटील प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव राजू चौधरी, रमेश महाजन देविदास महाजन अभिजीत पाटील आर एस पाटील रवींद्र पाटील के डी पाटील राजेंद्र शिंदे शालिग्राम गायकवाड गजानन पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश पाटील स्वप्निल सावंत पंकज पाटील राज पाटील गोटू पाटील हेमंत पाटील शरद पाटील स्वप्नील बोरसे यांनी परिश्रम घेतले
पाटील वाडा येथे जिजामाता प्रतिमेचे पूजन भगिनींनतर्फे करण्यात आले यावेळी परिसरातील सर्व महिला उपस्थित होत्या.
डी डी एस पी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचार्य एन ए पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.