स्वामी विवेकानंद जयंती-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे साजरी…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर ग्राहक पंचायत तर्फे आद्य दैवत स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करण्यात आले. बैठकीची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ मां साहेब या विभूतींना मानवंदना करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्राहक गीत अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल, सौ. कपिला मुठे व सौ .वनश्री अमृतकर यांनी म्हटले. स्वामी विवेकानंद बद्दल श्रीमती विमल मैराळे सौ स्मिता चंदात्रे व जिल्हा निरीक्षक मकसूद बोहरी यांनी तर राजमाता जिजाऊ मां साहेब बद्दलची माहिती सौ पद्मजा पाटील यांनी दिली.ग्राहक पंधरवड्यात विविध प्रकारच्या ग्राहक जागृती पर परिपत्रके तयार करून ग्राहकपंचायती मार्फत महिला मंचच्या कार्यक्रमात वाटण्यात आल्यात व ग्राहकांच्या आलेल्या विविध प्रश्नांचे व वीज बिलांबाबत आलेल्या तक्रारी बाबत जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख श्री सुनील वाघ यांनी निराकरण केल्याच्या सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सायबर प्रमुख विजय शुक्ला यांनी केले तर संचालन जिल्हा महिला कोषाध्यक्ष सौ कपिला मुठे तर आभार प्रदर्शन सौ वनश्री अमृतकर यांनी केले. याप्रसंगी सौ गोसावी, सौ ज्योती भावसार आदी महिला कार्यकर्त्या बहुसंख्य संख्येने उपस्थित होते अशी माहिती पी.आर.ओ .जयंतीलाल वानखेडे कळवितात.