ग्रामीण उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्या मंदिर व गोपिगोल्ड इंग्लिश मेडियम या शाळेचे जल्लोष 2023 वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने…

एरंडोल( प्रतिनिधी) एरंडोल ग्रामिण उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्या मंदिर व गोपीगोल्ड इंग्लिश मेडीयम या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांच्या वाव मिळावा व त्यांच्या मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे या उदात्त हेतुने जल्लोष २०२२-२३ या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रामायण ,शिवकालिन प्रसंग,वारकरी नाट्य तसेच सर्वधर्म समभाव व देशभक्ती गीते, गौळण , लावणी हिंदी मराठी नृत्य गीतांचे कलाविष्कार सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या सुंदर नृत्यकलेचे प्रकटीकरण व नाट्यअभिनयाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील तर अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.रमेशभाऊ परदेशी, संस्थेचे अध्यक्ष सचिनभाऊ विसपुते, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,शालिकभाऊ गायकवाड,नगरसेवक डॉ.सुरेश कालेश्वर पाटील, नरेंद्र पाटील ,राजेंद्र शिंदे,शिवसेना जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील,भाजपा माजी तालुकाध्यक्ष श्री.भिकाभाऊ कोळी विखरणचे राजेंद्र देसले, पिंटुभाऊ राजपूत ,गालापूरचे सरपंच आरिफदादा शेख,धारागीरचे सरपंच विजयसिंग पाटील,पोलिसपाटील दिलीप राघो पाटील, हणमंतखेडे येथील विठ्ठल केशव पाटील इ.उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते वर्षभरात विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.यश संपादन केलेल्या गुणवंतांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, आजच्या माहीती अन तंत्रज्ञानाच्या युगात सामोरे जातांना तुमचा सर्वाँगीण विकास झालेला असणे गरजेचे आहे .यासाठी स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तेव्हाच जग तुमचा आदर करेल.आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी शाळेतील संस्कार महत्वाचे असल्याचे मत प्रतिपादन केले.दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रगती व शाळेचा चढता आलेख याबाबत कौतुक केले..
कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजुषा चव्हाण मँडम यांनी, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री संजय मराठे व सौ.पटवारी मँडम यांनी तर सौ.रुपाली जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माध्यमिक विद्या मंदिर व गोपी गोल्ड इंग्लिश मेडीयम शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.