एरंडोल येथे एकाच दिवशी चोरांनी हात मारला ट्रॅक्टरवर व दुचाकीवर.

एरंडोल(प्रतिनिधी) एरंडोल येथे पार्वती नगरातील प्लॉट नंबर २३वर मोकळ्या जागी लावलेले एम एच १९ पी व्ही ९७१६ क्रमांकाचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले नामदेव सिताराम पाटील यांनी १२ जानेवारी २३ रोजी रात्री शेतीचे काम आटोपून चौधरी मंगल कार्यालयाजवळ त्यांच्या प्लॉटवरील मोकळ्या जागेत ट्रॅक्टर उभे केले होते. १३ जानेवारी सकाळी गुरांचा चारापाणी करण्यासाठी ते प्लॉटवर गेले असता त्यांना ट्रॅक्टर जागेवर दिसले नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ट्रॅक्टर मिळून आले नाही.
राहत्या घराच्या अंगणात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली
दरम्यान मकर संक्रांतीच्या आधी पुन्हा एकदा दुचाकी व त्याबरोबर ट्रॅक्टर वर संक्रांत आल्याचे दिसून येते.