मकरसंक्रांतीला सानेगुरुजी स्मारकाजवळील टेकडीवर रंगणार आनंदाचा पतंग उत्सव… रोटरी क्लब व विनोदभैय्या पाटील मित्र परिवाराचे आयोजन..

अमळनेर(प्रतिनिधी)शहरात मकरसंक्रांतीला पतंग उत्सव आयोजित करण्याची परंपरा गत काही वर्षांपासून सुरू झाली असताना यंदाही हा आनंदाचा पतंग उत्सव गलवाडे रस्त्यावरील सानेगुरुजी स्मारकाजवळील टेकडीवर रंगणार असून याची जय्यत तयारी करण्यांत येत आहे.
रोटरी क्लब,अमळनेर व विनोदभैय्या पाटील मित्र परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव मकरसंक्रांतीला दि 15 जानेवारी रोजी सायंकाळी रंगणार असून दुपारी 4 वाजता या उत्सवाचे उद्घाटन आ.अनिल भाईदास पाटील व कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी वृंद,रोटरी सदस्य,तसेच पतंग शौकीन उपस्थित राहणार आहे,याठिकाणी उंच टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात संगीतमय वातावरणात पतंग उडविण्याचा आनंद घेता येणार आहे,तसेच येथे पतंग आयोजकांकडून पुरविल्या जाणार असून मांजा आपण स्वतः आणायचा आहे.शहरापासून अतिशय नजीक ही टेकडी असल्याने मोठी गर्दी होणारआहे.
दरम्यान विविध सण आणि उत्सवांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शहरात नेहमीच विविध उत्सव आयोजित करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय उद्योगपती आर के दादा पाटील यांनी सुरू केली असून तीच परंपरा उद्योगपती विनोदभैय्या पाटील यांनी अखंडितपने सुरु ठेवली आहे. त्यांच्या योगदानातून गेल्या काही वर्षांपासून दर मकरसंक्रांतला अंबरीश टेकडीवर पतंग महोत्सव होत असतो,बच्चे कंपनीसह मोठी मंडळी देखील आनंदाने सहभागी होत असते, दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता मात्र यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असून केवळ ठिकाण सानेगुरुजी स्मारकाजवळील टेकडीवर करण्यात आले आहे.तरी सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब व विनोदभैय्या पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.