एरंडोल येथे काँग्रेस तर्फे अल्पसंख्यांक विभागासाठी नियुक्तीपत्र वितरण..

एरंडोल(प्रतिनिधी) जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुन्नवर खान यांनी एरंडोल अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी शेख कलीम शेख हुसेन यांची निवड केली आहे तर शेख मुजम्मिल गुलाब यांची जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेख कलीम यांना नियुक्तीपत्र देताना काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन डॉक्टर के ए बोहरी डॉक्टर फरहास बोहरी, तालुका अध्यक्ष योगेश महाजन, शहराध्यक्ष संजय भदाणे, ओबीसी तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा सचिव प्राध्यापक आर एस पाटील बबन वंजारी डॉक्टर प्रशांत पाटील, सय्यद अंजुम आशमी, जाकीर शेख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
फोटो ओळ
कलीम शेख यांना अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देताना विजय महाजन व इतर मान्यवर