कुणबी म्हणवून घ्यायचा लाज वाटते तर शेती विका!

24 प्राईम न्यूज 19 Nov 2023

आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे. मग कुणबी म्हणवून घ्यायला लाज वाटायचे कारण काय. शेती करणे म्हणजे कुणबी. ज्याला कुणबी शब्दाची लाज वाटते, त्याने शेती विकून चंद्रावर जावे, असा सल्ला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जरांगे पाटील म्हणाले, “प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा. सरकारला निवेदन द्या, कोणालाही भिऊ नका. फक्त शांततेत आंदोलन करा. मी प्रांतीय भेदभाव करत नाही. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा भेद करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहेमनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी लेकरं उन्हात आहेत तुमच्याबरोबर मी देखील उन्हात आहे. घाबरून घरात बसलो तर आरक्षण कसे मिळणार ? ७० वर्षापासून पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षण असतानाही आरक्षण मिळाले नाही. मराठे कुणबी नाही मग आता कशा सापडल्या? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केले आहे. ७० वर्षांचा आमचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार आहे. आरक्षण असताना आम्हाला का दिलं गेलं नाही? आमच्या लेकरांनी असे काय पाप केले असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.