धक्कादायक, प्रियकरासोबत तरुणीनेच रचला होता दरोडा, अपहरणाचा कट !
धुळे जिल्ह्यातील साक्रीतील घटना उघड..

24 प्राईम न्यूज 30 Nov 2023 संपूर्ण धुळे जिल्हा हादरून सोडणा-या साक्री दरोडा प्रकरणी उकल झालेली असून गत २५ नोव्हेंबर रोजी रात्री

साडेदहा वाजता साक्री शहरातील विमलाबाई महाविद्यालया जवळील निलेश पाटील यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यातील मास्टर माईंड दुसरा तिसरा कुणी नसून दस्तुरखुद्द पाटील यांची भाची हिच असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसानी केलेल्या सखोल तपासा दरम्यान या घटनेचा संपूर्ण तपशील समोर आला आहे साक्री दरोडा प्रकरणी प्रियकरा सोबत फसला निशा शेवाळेचा डाव या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर हा मुळचा शाजापूर जि.शाजापूर मध्य प्रदेश हा असून तो गेल्या दोन वर्षा अगोदर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सौर उर्जा ठेकेदार म्हणून कामास होता. या कालावधीत विनोद भरत नाशिककर हा धुळे येथील आदर्शनगर मध्ये निशा शेवाळे हीच्या घराशेजारी वास्तव्यास होता. त्यानतर भरत नाशिककर हा आपल्या मुळं गावी शाजापूर जि शाजापूर मध्यप्रदेश येथे परत निघून गेला मात्र निशा शेवाळे व विनोद नाशिककर हे नियमित इंस्टाग्राम अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते निशा शेवाळे हिस प्रियकर विनोद नाशिककर यांच्या समवेत पळून जायचे असल्याने हे सगळे कट कारस्थान निशा हिनेच विनोद नाशिककर यांच्या संगनमताने रचून विनोद नाशिककर याने आपले काही हरियाणा राज्यातील मित्र बोलावून घेत दिनांक २५ नोव्हेंबर रोजी साक्री शहरात दरोडा घातला. यात ज्योत्स्ना निलेश पाटील यांच्या घरातून सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल विनोद नाशिककर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरुन नेला. या दरोड्याचा सखोल तपास साक्री पोलिसांनी करून या दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास
साक्री पोलिस करीत आहेत.