जरानगे पाटील यांची 3 रोजी अमळनेरात होणार सभा..

अमळनेर /प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढणारे

मनोज जरांगे पाटील यांची ३ रोजी अमळनेर येथे सभा होणार आहे. यासाठी पूर्वनियोजन बैठक मराठा मंगल कार्यालयात झाली. यामुळे या सभेची उत्सुकता लागून आहे. सभा ही साने गुरुजी शाळेमध्ये होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस प्रवीण देशमुख, सचिन वाघ, जयवंत पाटील, हर्षल जाधव , कल्याण पाटील, मनोहर पाटील, के डी पाटील, अशोक पवार, विक्रांत पाटील, संदीप घोरपडे, जयेश पाटील, जितेंद्र देशमुख, शुभम देशमुख, अविनाश पाटील स्वप्नील पाटील, संजय पुनाजी पाटील व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. जरांगे पाटील जळगाव व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असल्याने अमळनेरच्या सकल मराठा बांधवांनी त्यांना अमळनेर येथे येण्याचे आमंत्रण दिल्याने त्यांनीही स्वीकारले. अमळनेरात सत्ताधारी मंत्री अनिल पाटील असून समाज बांधवांनी सरकारशी लढणाऱ्या जरांगे पाटील यांना निमंत्रण दिल्याने त्यांच्या सभेकडे तालुक्याचे विशेष लक्ष लागून