विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, सरकारच्या चहापानाला जाणे, हा संकटातील शेतकऱ्याप्रती द्रोह..

24 प्राईम न्यूज 7 Dec 2023

राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्दैवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होता. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्दैवाने सरकारने शेतकऱ्यांप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही; पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्हीचहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.