ओवैसींसमोर शपथ घेणार नाही, भाजप आमदार टी राजा सिंह यांचा निर्णय

24 प्राईम न्यूज 10 Dec 2023

तेलंगाणाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून इथे काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता नवनियुक्त आमदारांचा शपथविधी होणार असून तेलंगाणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून एमआयएम पक्षाचे अकबरुद्दीन ओवैसी यांची निवड करण्यात आली आहे. ते शनिवारी हंगामी अध्यक्षाची शपथ घेणार आहेत. मात्र ओवैसी अध्यक्ष पदावर असेपर्यंत आपण आमदारकीची शपथ घेणार नाही असे भाजपच्या टी राजा सिंह यांनी जाहीर केले आहे. के. चंद्रशेखर राव हे एमआयएमला घाबरायचे आणि रेवंत रेड्डी हे देखील एमआयएमला घाबरत असल्याचा आरोप टी.राजा यांनी केला आहे. काँग्रेसने भीतीपोटी ओवैसी यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नेमल्याचा आरोप टी. राजा यांनी केला आहेटी राजा सिंह यांनी म्हटले की, ‘नव्या सरकारचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नियुक्तीनंतर त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, रेवंत रेड्डी म्हणायचे की AMIM, BJP आणि BRS हे सगळे आतून एक आहेत. आज जनतेला कळले आहे की कोण कोणासोबत आहे. ?