मांडळ येथे उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन वाटप. गरीब कुटुंबांना गैसचा वापर करता येणार.


अमळनेर प्रतिनिधी
मांडळ, दि. १० डिसेंबर २०२३: मांडळ येथील मोहिनी भारत गॅस एजन्सी कडून आज उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. यावेळी मांडळ गावाचे सरपंच सौ कुसुमबाई भास्कर पाटिल व मोहिनी गॅसचे मालक शाम संदानशिव उपस्थित होते.
या कार्यक्रमात मांडळ,मुडी, कळंबे गावातील 14 गरीब कुटुंबांना उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. यामुळे या कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल गॅसचा वापर करता येणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना मांडळ गावचे सरपंच कुसुमबाई पाटील यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे गरीब कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी गॅसच्या वापराचा लाभ मिळणार आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
या कार्यक्रमात मांडळ गावातील गरीब कुटुंबातील महिला उपस्थित होत्या. त्यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी केंद्र सरकारचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे आमचे जीवनमान उंचावणार आहे. यावेळी मोहिनी गॅस चे संचालक श्याम संदानशिब,भास्कर पाटील,सचिन कोळी,मंगेश कांडेलकर राहुल संदानशिव सह ग्रामस्थ उपस्थित होते..