गावठी हातभट्टीवर छापा टाकून हातभट्या केल्या उद्ध्वस्त. पोलीस निरीक्षकांची कारवाई.

अमळनेर/प्रतिनिधि

गावठी हात भट्टी दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे संसार उदध्वस्त होतात म्हणनुच अवैध गावठी हात भट्टी दारुवर कठोर प्रतिबंधक कारवाईच्या अभियान अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी हाती घेतले आहे
आज रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी स्वता समक्ष व त्यांच्या पथकाने अमळनेर हद्दीत आज सायंकाळी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे, PSI विकास शिरोळे, रवी पाटील मिलिंद बोरसे,घनशाम पवार अशा टिमने दारु रेड केल्या.
चार गुन्हे दाखल केले असून एकूण,2,000 लीटर रसायन,
किंमत 1,00,000 रु.157 लिटर गा.हा.भट्टीदारु,15,700 रु
एकूण 1,15,700 रु. किंमतीचा माल जप्त करुन नाश केला.