उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणे व्हावे, नाही तर मी सगळे बाहेर काढणार..
मनोज जरांगेंचा घणाघात.

24 प्राईम न्यूज 11 Dec 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणे व्हावे, नाही तर मी सगळे बाहेर काढणार. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता, पण आता खोड्या करायला सुरुवात केली आहे. फडणवीसांनी आता स्वतःच्या माणसांना बोलायला सांगितले आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसे बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी-मराठा एकत्र आहे, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. त्यावर लवकरच सविस्तर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
मराठा समाजाशी तुमचा सामना आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघुयात. तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असेल, तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. मराठ्यांत कलह लावू नका, असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.