अजितदादांनी जे केले ती चोरीच.. -रोहित पवारांचा काकांवर आरोप.

24 प्राईम न्यूज 11 Dec 2023

केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील सुनावणी पूर्ण झाली असून आता आयोगाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहया असलेल्या ज्या पत्राच्या आधारे अजितदादा गटाने राष्ट्रवादी आमचीच असा दावा केला आहे, ते पत्र अजितदादांनी चोरल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी दावा केला की, आमचे एकच मत आहे की, पत्रावर आम्ही सह्या करत असताना काय लिहिले होते ? अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते व्हावेत, यासाठी आमच्या सह्या घेतल्या गेल्या होत्या, मात्र आता निवडणूक आयोगासमोर ते पत्र वापरले की काय अशी शंका आम्हाला आली. ते पत्र जर त्यांनी वापरले असेल, तर साध्या भाषेत याला चोरीच म्हणावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.