साकीब नाचनच सूत्रधार..
परदेशी हँडलरच्याही संपर्कात एनआयएचा आरोप

24 प्राईम न्यूज 11 Dec 2023

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी महाराष्ट्र व कर्नाटकात छापेमारी करून १५ जणांना अटक केली. यातील साकीब नाचन हा ‘इसिस’चा महाराष्ट्रातील दहशतवादी मॉड्युलचा मुख्य सूत्रधार होता. तो ‘इसिस’चा परदेशातील हँडलर मोहम्मद भाई, अबू सुलतान आणि अबू सुलेमान यांच्या संपर्कात होता. एनआयएच्या तपासानुसार, नाचनने स्वतःला धर्मगुरू म्हणून सादर केले. त्याचा मुलगा शामील नाचन यालाही एनआयएने अटक केली आहे. भारतात ‘इसिस’ खिलाफत संबंधित क्षेत्र बनवण्याचे लक्ष्य नाचनचे होते. आपल्या संघटनेत भरती करताना नाचनने तीन प्रकारच्या शपथ प्रक्रिया तयार केल्या. ज्येष्ठतेनुसार तो भरती करत होता. ही शपथ घेताना त्यांच्या मागे ‘इसिस’चा झेंडा दाखवला जात होता, असे काही अटक आरोपींनी चौकशीत सांगितले