अमळनेर न पा प्रशासन करणार भटक्या कुत्र्यांची नसबंदी सहबंदोबस्त.                                                      .                                                                          “काही प्राणीमित्र संघटनेच्या विरोधामुळे न पा झाली हतबल”

0

अमळनेर / प्रतिनिधी,-

येथील न पा प्रशासन भटक्या कुत्र्यां सह ईतर जनावरं यावर आवर घालण्यासाठी नसबंदी करून बंदोबस्त करण्यासाठी झाली सज्ज .मात्र प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून होत आहे विरोध.

शहरात मोकाट जनावरे सर्रासपने रस्त्यावर वावरताना दिसतात.यामुळे अपघात सह वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिक खुपच त्रस्त झाले आहेत.भटक्या कुत्र्यांनी कॉलनी परिसरात अक्षशः उच्छाद मांडला आहे.रस्त्यांनी चालणाऱ्या नागरिकांना भित भित चालावे लागत आहे.अलीकडेच एका सहा वर्षाच्या मुलीस भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने पन्नास टाके पडले.यामुळे शहरातील लहान मुलां सह वृध्द नागरिकांच्या मनात भय निर्माण झाले आहे.अश्या मोकाट कुत्र्या सह जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कलम ८९/९० नुसार पोलिसांना विशेष अधिकार बहाल केले गेले आहेत.मात्र या बाबतीत न पा प्रशासन व पोलिस प्रशासन पाहिजे तशी पावले उचलताना दिसत नसून सदर जबाबदारी एकमेकावर ढकलतानां दिसते.अश्यातच काही प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून अशी कारवाई करू नये म्हणून न पा प्रशासनावर उच्च स्तरावरून दबाव आणला जात आहे.अश्या संघटनेने नागरिकांच्या जिविताचे रक्षण करावे व या मोकाट जनावराचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशांत सरोदे,मुख्यधिकारी – शहरात मोकाट फिरणारे जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर निविदा प्रक्रिया राबवली जात असून लवकरच कुत्र्या सह मोकाट जनावरे व डुकरांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यास न पा प्रशासन कटिबध्द आहे.मात्र काही प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून असे नकरण्यासाठी दबाव येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!