नंदुरबार येथे एम. आई. एम. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याने दिले निवेदन…..

नंदूरबार/प्रतिनिधि

नंदुरबार येथे एम. आई. एम. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याने नाशिक परिक्षेत्र नाशिक चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना उत्तर महाराष्ट्र उपअध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांनी निवेदन सदर केले.
दि. 11/12/2023 सोमवार रोजी उत्तर महाराष्ट्र उपअध्यक्ष
सैय्यद रफअत हुसैन, नंदुरबार, यांनी नाशिक परिक्षेत्रचे आय.जी
श्री बी. जी. शेखर पाटिल यांना नाशिक येथील त्यांचे कार्यालयात समक्ष भेट घेऊन नंदुरबार येथे एम. आई. एम. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्याने सदर खोटे गुन्हे मागे घेणे कामी सविस्तर चर्चा करून पुराव्यांसह निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की माझे व माझ्या कार्यकर्त्यांवर राजनीतिक दबावाखाली येऊन डिपार्टमेंट चे कर्मचारी व अधिकारी खोटे गुन्हे दाखल करून आमचे राजकीय अस्तित्व सम्पवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्यवर होणारे खोटे गुन्हे त्वरित माघे घेण्यात यावे असे निवेदन पुराव्या सहीत सिनियर लीडर जावेद मुंशी, नाशिक, उत्तर महाराष्ट्र कोर कमेटी सदस्य मुख्तार शेख, नाशिक, युवा अध्यक्ष रमज़ान पठान,सिनियर लीडर रशीद जनाब, नंदुरबार, वाहतूक विंगचे मुखतार मिर्झा, नंदुरबार, सैय्यद सैफ अली, नाशिक, फ़रीद शेख नाशिक,अरबाज शाह यांनी दिले.