शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी अजित पवारांचाच होता विरोध. .
-संजय राऊतांचा गौप्यस्फोट हाताखाली काम न करण्याची होती भूमिका

24 प्राईम न्यूज 12 Dec 2023

२०१९ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे आघाडी सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यासंबंधी चर्चा झाली, त्यावेळी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादी कद्विसने विरोध केला. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असाच सर्वांचा हेका होता. त्यात अजित पवार आघाडीवर होते. त्यांनी तर एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त विरोध केला होता, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला, मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिदिसोबतकाम करीत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना अजित पवारांपासून वळसे-पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे या सर्वच नेत्यांचा एकच हेका होता की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणारनाही. तुम्ही कोणाला विधिमंडळ नेता निवडणार आहात हे सांगा, अशी विचारणा केली जात होती. याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. यासंदर्भात आमची ताज लँड्समध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर आम्ही लिफ्टमधूनउतरत असताना अजित पवार यांनी तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नसल्याचे स्पष्टच सांगितले होते. हे नेते आता आम्हाला काय शहाणपण शिकवित आहेत, असा सवाल खा. राऊत यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे, तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व भाजपलाही मान्य नव्हते. परंतु हे नेते आता त्यांच्या हाताखाली काम करायला लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले, याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वांचीच संमती होती. अर्थात, त्यांचे नेतृत्व सर्वांनाच मान्य होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी सांगितले.