सियाचीन पोस्टमध्ये प्रथम महिला वैद्यकीय अधिकारी कॅप्टन फातिमा वसीम यानी रचला इतिहास..

24 प्राईम न्यूज 12 Dec 2023

भारतीय सैन्य दलातील कॅप्टन फातिमा वसीम सियाचीन ग्लेशियरवरील ऑपरेशनल पोस्टवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरल्या आहेत. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर १५,२०० फूट उंचीवर असलेल्या ऑपरेशनल पोस्टवर त्यांना तैनात करण्यात आले आहे. उत्तर भारतातील २०,०६२ फूट उंच सियाचीन ग्लेशियर जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. कॅप्टन फातिमा वसीमची १५ हजार फूट उंचीवरील पोस्टिंग त्यांची अदम्य भावना आणि उच्च प्रेरणा दर्शवते, असे लष्कराने म्हटले आहे.