अमळनेर नगरपरिषदेने पू.सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल, येथिल परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते सुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावे.. -लोकमान्य स्मारक समितीतर्फे मागणी.

0

अमळनेर/प्रतिनिधि

अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या अ.भा.मराठी व विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिड शतकापासून वांडमयीन व साहित्यिक सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार राहिलेले पू. सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल यांचे परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते नगरपरिषदेने करून द्यावे अशी मागणी न.प.मुख्याधिकारी यांचे कडे संबंधित संस्थाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
दीड शतकापासून वांडमयीन व साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार राहिलेले पू. सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले लोकमान्य स्मारक समिती सभागृह यांचे खान्देशच्या साहित्यिक व वांड;मयिन इतिहासात महत्वाचे स्थान आहे. अश्या वास्तूंना अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन तसेच १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्भूमीवर भारतातील,व राज्यातील नामवंत साहित्यिक,वाचक, श्रोते भेट देतील.सदर परिसरात पू. सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र चालविले जाते जिथे राज्यभरातील आय एस व आय पी एस अधिकारी येत असतात.म्हणून अमळनेर नगरपरिषदेने पू.सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल येथिल परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते सुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करून दिलेल्या निवेदनातून यावेळी लोकमान्य स्मारक समितीचे चिटणीस प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, पू.सानेगुुरूजीं ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ,अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी केली.सदर मागणीस या वास्तूंचा परिसरात लक्ष घालून रस्ते विषयक सुविधा देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिला याप्रसंगी न.प.चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,न.प.शिक्षण मंडळाचे लिपिक सुनिल पाटील हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!