अमळनेरच्या दिनेश बागडेला पॉवरलिफ्टिंगमध्ये ब्राँझपदक…

अमळनेर /प्रतिनिधि

अमळनेरच्या पॅरा पॉवरलिफ्टर दिनेश बागडेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या एलिट १०७ किलो वजन गटात १४८ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. त्याचे रौप्यपदक केवळ दोन किलोंनी हुकले. राजस्थानच्या मिलन कुमारने १५० किलो वजन उचलताना रौप्यपदकाचा मान मिळविले. महाराष्ट्राचे हे या क्रीडा प्रकारातील चौथे पदक ठरले.