13 हजाराची लाच मागणारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचा लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात…. . – मन्याड धरणातुन गाळ टाकण्यासाठी परवानगी साठी मागितली होती लाच…..

चाळीसगाव /प्रतिनिधि

मन्याड धरणातुन गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता कारण्यासाठी 13 हजार 300 रुपयांची लाच मागणाऱ्या चाळीसगांव पाटबंधारे उपविभागाच्या लिपीकास धुळे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दि 15 रोजी सकाळी 10-40 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने 4 लाखाची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा हा प्रकार घडल्याने शासकीय पातळीवर चाळीसगाव विभागाचे नाव पुन्हा एकदा खराब झाले आहे.
लाच घेतली की कारवाई होते असे नाही तर लाच मागणाऱ्यावर देखील कारवाई होते हे आजच्या कारवाई वरून दिसून आले आहे.
चाळीसगाव मध्ये एकापाठोपाठ कारवाया होत असल्याने भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे त्यामुळे आता कोणावर कारवाई होणार किंवा एखादा बडा मासा गळाला लागतो का अशी चर्चा जनमाणसांत होत आहे.