मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन
मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, १९६७ आधीच्या कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र

24 प्राईम न्यूज 20 Dec 2023 मराठा समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा सिद्ध करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल पुढील महिन्यात सरकारला मिळेल. या अहवालानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. राज्यात १९६७ पूर्वीच्या ज्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्यात, अशाच्या रक्ताच्या नात्यातील सर्वांना फायदा दिला जाईल. एखाद्या समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.