दोन महिन्यांत पालटणार बस स्थानकांचे चित्र. -प्रभारी परिवहन मंत्री दादा भुसें

24 प्राईम न्यूज 20 Dec 2023
राज्यातील बसस्थानकांवर विविध प्रकारच्या सुविधा देण्याकरिता कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या दोन महिन्यांत राज्यातील बसस्थानकांचे चित्र सकारात्मकरीत्या बदललेले दिसेल, असा आशावाद राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत व्यक्त केला.
राज्यातील बसस्थानकांची दुरुस्ती करून तेथे विविध सेवा उपलब्ध करून देण्याबद्दलचा तारांकित प्रश्न विविध आमदारांनी उपस्थित केला होता. राज्यात सुरू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ५७७पैकी ३९४ बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे, अशी टीका आमदारांनी केली.
आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना भुसे यांनी राज्यातील बसस्थानकांचे स्वरूप दोन महिन्यांत बदलणार असल्याची माहिती दिली.