महाराष्ट्राचे राज्य मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी इज्तेमा जागेची पाहणी करत केले आव्हान..

अमळनेर/ प्रतिनिधि शहरात दिनांक ३० आणि ३१डिसेंबर २०२३ रोजी सुन्नी दावते इस्लामी तर्फे होणारा ईज्तेमा हा दोन दिवशी प्रवचन कार्यक्रम होणार असून विश्व प्रसिद्ध मौलाना शाकीर अली नूरी साहेब,सय्यद अमिनुल कादरी साहेब,कारी रिझवान साहेब, आदी मान्यवर येणार आहेत.
या दोन दिवशी धार्मिक कार्यक्रमात अंदाजे ७० ते ८० हजार लोक येणार असून असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे या कार्यक्रमाच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्य मंत्री अनिल भाईदास पाटील, फयाज़ रज़वी, मुख्तार खाटिक, इमरान खाटीक, आबिद अली सय्यद, मोईज सय्यद,बाबा शेख, शराफत अली,अझहर नूरी, नासीर हाजी, सत्तार मास्टर तेली,अलीम मुजावर, सईद नूरी,इरफान नूरी,यांच्यासह बहुसंख्यात मान्यवर उपस्थित होते।
राज्यमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी म्हटले की ३०/३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र भरातून मुस्लिम बांधव येणार असून धर्मगुरूंच्या माध्यमातून सर्व स्थानिक मान्यवरांची फार मोठय़ा प्रमाणावरून अमळनेर तालुक्यात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात धूळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यातील मुस्लिम बांधव येणार आहे.
येणार्या धर्मगुरूंच्या अभ्यास्तून
आपल्या धर्माचे पालन कसे करायचे आपल्या धर्मावर कसा चालायचा
या द्रुष्टिकोणातून आपण घेतला पाहिजे,येणार्या सर्व मुस्लिम धर्मगुरूंचा व बांधवांचा आम्ही स्वागत करतो।