अवैध फोन टॅपिंग केल्यास ३ वर्षांची कैद, २ कोटी दंड !

24 प्राईम न्यूज 23 Dec 2023 देशातील १३८ वर्षे जुना टेलिग्राफ कायदा रद्दबातल करत त्या जागी आणण्यात आलेले न दूरसंचार विधेयक-२०२३ बुधवारी बा लोकसभेत मंजूर करण्यात आले. ग प्रस्तावित कायद्यात अवैधरीत्या न फोन टॅपिंग किंवा दूरसंचार – उपकरणांचा दुरुपयोग केल्यास ३ ■ वर्षांपर्यंतची कैद आणि २ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच सरकार आवश्यक वाटेल तेव्हा कोणत्याही दूरसंचार सेवेवर नियंत्रण मिळवू शकते. या विधेयकाद्वारे दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांना सीमकार्ड देण्यासाठी बायोमेट्रिक ओळख पटवणे अनिवार्य करण्यात आले असून बोगस सीमकार्ड घेणाऱ्यास ३ वर्षांची कैद व ५० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात अ आहे.