आता मागे हटणार नाही !
मनोज जरांगे आंदोलनावर ठाम..

24 प्राईम न्यूज 23 Dec 2023राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करू. सरकारने आता तरी भानावर यावे. पुन्हा एकदा लाठीमार करण्याचा प्रयोग करू नये, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल. आता आम्ही मागे हटणार नाही. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही. ५४ लाख नोंदी हा अधिकृत आकडा आहे, अशा शब्दांत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जरांगे शुक्रवारी परभणी जिल्ह्यातीलसगेसोयरे या शब्दांवर सर्वकाही अडकले आहे. आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत कसा बसवायचा हे त्यांनी बघायला हवे. त्यातले दोन शब्द मुख्यमंत्र्यांनी पटलावर घेतले नाही. तो कागदही त्यांच्याकडे आहे. आम्हाला टाईम बॉण्डबाबत नाही बोलले तर बरे होईल. शब्द त्यांच्याच मंत्रिमंडळाने दिला, तोच त्यांनी पाळावा. ज्यांची १९६७च्या आधीची नोंद मिळाली त्याच्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असेही जरांगे-पाटील म्हणाले.
अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारीचा उल्लेख करीत मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाज कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र आला नव्हता, आता तो आला आहे. हेच सरकारला खुपत आहे. याआधी तुम्ही नोटिसा देऊन मराठा समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आता होऊ देणार नाही. लाठीमारात लोकांची डोकी फुटली, हात मोडले आणि पायही मोडले. कुणाच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या. त्याचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले. सरकारने आता तरी भानावर यावे. दोन दिवसात पुन्हा असाच प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.