जरांगेंना देवही अडवू शकत नाही, मग सरकार काय? -छगन भुजबळ…

0

24 प्राईम न्यूज 23 Dec 2023 राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी न करता थेट मराठा आरक्षणाचा जीआर काढला पाहिजे. एवढेच नव्हे तर मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जालन्याला जाण्याऐवजी अंतरवाली सराटी येथेच दोन-चार मंत्र्यांचे कायमस्वरूपी बंगले आणि मुख्य सचिवांचे एक कार्यालयही सुरू करावे, जेणेकरून मनोज जरांगे यांच्या डोक्यातून एखादी अभिनव कल्पना निघाली की मुख्य सचिव लगेच सही करून तसा जीआर काढू शकतील. जरांगेंना देवही अडवू शकत नाही, मग सरकार काय, असा खोचक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जरांगेंनी सरकारला नव्हे तर सरकारनेच जरांगेंना वेठीस धरले आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सगळ्यांनाच आरक्षण दिले पाहिजे. मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील, अशी उपरोधिक टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!