राष्ट्रवादी सरचिटणीस इर्शाद भाई जागीरदार यांनी दोन दिवशी इज्तेमा नियोजनाची केली पाहणी..

अमळनेर/प्रतिनिधि शहरातील होणाऱ्या सुन्नी दावते इस्लामी तर्फे ३०/३१ डिसेंबर या दोन दिवशी प्रवचन कार्यक्रम होणार असून विश्व प्रसिद्ध शाकीर अली नूरी साहेब,सय्यद अमिनुल कादरी साहेब.कारी रिझवान साहेब.मान्यवर येणार आहे
त्या कार्यक्रमात अंदाजे ७० ते ८० हजार लोक येणार असून अंदाजे आयोजकाकडून व्यक्त केल्या जात आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी सरचिटणीस इर्शाद भाई जागीरदार ,यांच्या सह फयाज रजवी, मुख्तार खाटिक,आरीफ पठान, इमरान खाटीक, आबिद अली सय्यद, मोईज अली सय्यद,बाबा शेख,अंबर अली,अझहर नूरी,रिजवान नुरी, मुजम्मील शेख, मुदस्सिर अली, शोऐब सैय्यद, अफसर भाई, राशीद शेख, जाहीद अली यांच्या सह बहुसंख्यात मान्यवर उपस्थित होते
इर्शाद भाई जागीरदार यांनी म्हटले की ३०/३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र भरातून मुस्लिम बांधव येणार आहे. धर्मगुरूंच्या माध्यमातून सर्व स्थानिक मान्यवरांची फार मोठा प्रमाणावरून अमळनेर तालुक्यातील कार्यक्रमाचा नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यावर मुस्लिम बांधव येणार आहे.