पारोळा बसस्थानक परिसराचा भूमिपूजन सोहळा संपन्न… . -आमदार पाटील यांचा प्रयत्नांतून काँक्रिटीकरणासाठी दीड कोटी रुपये मंजूर

प्रकाश पाटील/पारोळा
पारोळा येथील बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन दिड कोटी रूपयांचा विकासकामाचा भव्य भुमीपुजन सोहळा आज आमदार पाटील यांचा शुभहस्ते व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा,विभागीय अभियंता अक्षय महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून आजवर बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवाशी,बसचालक, रिक्षाचालकांसह व्यवसाय करणारे व्यापारी बांधव व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती तसेच या बसस्थानकावरून रहदारी वाहनांमुळे संपुर्ण धुळीचे साम्राज्य होत होते.पावसाळ्यात तर मोठा चिखल येथे साचत असल्याने नागरिकांना पायी चालणेही जिकरीचे झाले होते. परंतु आता या कामाच्या भुमीपुजनामुळे हे काम पुर्ण होणार आहे.या सर्वच समस्यांना आळा बसणार असल्याने या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करणारे व्यापारी बांधव,श्री बालाजी रिक्षा युनियन तर्फे आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी मनोगतात, नागरिकांचा दैनंदिन आणि भविष्यातील गरजेचा विषयांना मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. बसस्थानकाचा नुतनीकरणाचे मंजुरीचे काम जसे आपण मार्गी लावले तसेच आज बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण, रंगरंगोटीचे काम ही माझ्याच कार्यकाळात होत आहे, असे म्हणत त्यांनी मतदारसंघात सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोट्यावधींचा विकासकामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला व सदरील काम हे उच्च प्रतीचे होण्यासाठी विशेष लक्ष देण्याचा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
या भुमीपुजन सोहळ्याचे प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले.राकेश शिंदे,रामचंद्र पाटील, दयाराम पाटील,भगवान जगनोर, चतुर पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन नंदकुमार पाटील यांनी केले.
यावेळी बाजार समिती मा. संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील,पोपट चव्हाण,जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील,मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील,जि.प.मा.सदस्य पांडुनाना पाटील,रोहीदास पाटील,मा.उपनगराध्यक्ष रविंद्र पाटील,उपजिल्हाप्रमुख प्रशांतपाटील,तालुकाप्रमुख मधुकर पाटील,युवासेना तालुकाप्रमुख तथा सरपंच राकेश पाटील,शेतकी संघाचे मा.अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष नाना पाटील,मा. उपाध्यक्ष सखाराम पाटील,डाॕ. राजेंद्र पाटील यांचेसह अनेक पदाधिकारी,पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते.