सरकारला १ तासही देणार नाही
मनोज जरांगे-पाटील यांचा राज्य सरकारला इशारा..

24 प्राईम न्यूज 27 Dec 2023
छत्रपती संभाजीनगर। राज्य सरकारकडून आमची मोठी फसवणूक झाली आहे. यापुढे आम्ही सरकारला एक तासही देणार नाही. आमची सगळी तयारी झाली आहे. आम्ही सज्ज आहोत. येत्या २० जानेवारीपासून १० लाख गाड्यांसह ३ कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये धडकणार आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असा इशारा मंगळवारी छत्रपती न संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोजजरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत जे काही बळी गेलेत त्याला पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे. लवकर आरक्षण दिले तर ठीक, नाहीतर मराठे तुटून पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे जरागे पाटील म्हणाले.
आम्ही शेतातील काम आटोपून मुंबईला येण्याचे नियोजन केले आहे. मुंबईतील आंदोलन हे सर्वात मोठे असेल. मुंबईतील लोकं आमचीच आहेत. मुंबईतला प्रत्येक माणूस आमचे स्वागत करेल, अशी अपेक्षाही मनोज जरागेंनी व्यक्त केली.