मंगरूळ येथील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी जगदिश चौधरी व व्हॉ चेअरमन पदी जितेंद्र चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड…

अमळनेर /प्रतिनिधितालुक्यातील मंगरूळ येथील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी जगदिश चौधरी व व्हॉ चेअरमन पदी जितेंद्र चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकारी औद्योगिक वसाहतीचे संचालक देखील बिनविरोध निवडण्यात आले. कारखाना मतदार संघातून प्रदीप गुलाबचंद पारेख , जितेंद्र गंगाधर चंद्रात्रे , प्रसन्न प्रकाश शहा , दिलीप पंडित डेरे , शिरीष नथु पाटील , सचिन अशोक शिंदे , जगदिश लोटन चौधरी , महिला राखीव मतदार संघातून वैशाली नंदकिशोर शिरोडे , प्रियांका भरत कोठारी , इतर मागासवर्गीय मतदार संघातून रुपाली जगदीश चौधरी ,अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून आशा माधव बिऱ्हाडे , तर भटक्या विमुक्त जातीतून पद्माकर रामदासगीर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटी मतदार संघाची एक जागा मात्र रिक्त ठेवण्यात आली आहे. एकही सोसायटी पात्र नसल्याने या मतदार संघात कोणालाही उमेदवारी दाखल करता आली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले.
संचालक मंडळ बिनविरोध झाल्यानन्तर लागलीच चेअरमन व व्हॉ चेअरमन यांची निवड घेण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे मंत्री अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ यांनी अभिनंदन केले आहे.