मुंबईच्या आंदोलनाचा रोडमॅप तयार २० जानेवारी पासून लढ्याला सुरुवात-जरांगे..

24 प्राईम न्यूज 29 Dec 2023 मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून मुंबईत करण्यात येणाऱ्या उपोषण आंदोलनाचा रोडमॅप तयार झाला असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी दिली. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला २० जानेवारीपासूनच सुरुवात होईल. बीड जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथूनच मराठा आरक्षणाची दिंडी काढण्यातयेईल. त्यानंतर येथून मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. मुंबईत उपोषणाला बसण्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्क किंवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानापैकी एक ठिकाण येत्या एक-दोन दिवसात निश्चित केले जाईल. ही दिंडी बीडमधून जालना, शहागड, गेवराई, अहमदनगर, शिरूर आणि शिक्रापूरमार्गे रांजणगाव, खराडीमार्गे पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहचणार आहे. पुणे मुक्कामानंतर लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईत पोहचणार असल्याची माहितीही जरांगे यांनी दिली.